Skip to content
📞 9422654655✉ stbsvt@gmail.com
Sainiki Vidyalaya Tuljapur logoShri Tuljabhavani Sainiki VidyalayaSec. & Higher Sec. School, Tuljapur

श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

————तुळजापूर

येथील श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण क्षेत्रातील विद्येची सरस्वती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक डॉ पेटकर सर तसेच सर्व महिला शिक्षिका यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले तसेच सर्व महिला शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन विद्यालयातर्फे सत्कार करण्यात आला

याप्रसंगी सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री तुषार सुत्रावे सर यांनी सावित्रीबाईंचे कार्याबद्दल त्यांच्या काळातील त्यांच्या समस्या मुलींसाठी पहिली शाळा काढली मुलींचे शिक्षण प्रसार याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली प्रत्येक क्षेत्रात नोकरीमध्ये आज महिलांचे जास्तीत जास्त प्रमाण हे सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच दिसून येते तसेच विद्यालयातील कला शिक्षिका श्रीमती रत्नपारखी मॅडम यांनी विद्यालयातील मुख्य फलकावर सावित्रीबाईंचे सुंदर चित्र रेखाटन करून त्यांना अभिवादन करण्यात आले याप्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

← All notices