Skip to content
📞 9422654655✉ stbsvt@gmail.com
Sainiki Vidyalaya Tuljapur logoShri Tuljabhavani Sainiki VidyalayaSec. & Higher Sec. School, Tuljapur

सैनिकी विद्यालयात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

सैनिकी विद्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

सैनिकी विद्यालयात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

सैनिकी विद्यालयात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

सैनिकी विद्यालयात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी —————————————- श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तुळजापूर येथे दिनांक 14 एप्रिल रोजी महामानव, भारतरत्न, विश्वरत्न, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी मंचावर श्री तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट चे व्यवस्थापक व प्रशासक श्रीमान सोमनाथ वाडकर सर , विद्यालयाचे प्राचार्य श्रीमान वैजनाथ घोडके सर, पर्यवेक्षक डॉ. पेटकर सर, तसेच वर्गशिक्षक श्रीमान स्वामी सर व सुरवसे सर उपस्थित होते.

मंचावरील मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

याप्रसंगी माननीय तहसीलदार श्रीमान वाडकर सर यांनी डॉ. आंबेडकरांचे चरित्र, वाचन, ग्रंथ प्रेम, तसेच सलग 18 तास सलग अभ्यास तसेच संविधानातील कलमांचा स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या घटनांचे सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या चांगल्या संस्काराचे अनुकरण करावे त्याचबरोबर शिक्षकांनीही अभ्यास पूर्ण अध्यापन करावे असा सल्ला ही त्यांनी दिला. याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

त्याचबरोबर विद्यालयातील डॉ. विजय वडवराव सर यांनीही डॉक्टर आंबेडकरांच्या चरित्र, सामाजिक कार्य, राज्यघटना, संविधान, संविधानातील नियमावली या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री स्वामी आर. एस. यांनी केले कार्यक्रमाचे सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

← All notices