Skip to content
📞 9422654655✉ stbsvt@gmail.com
Sainiki Vidyalaya Tuljapur logoShri Tuljabhavani Sainiki VidyalayaSec. & Higher Sec. School, Tuljapur

श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयास जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांची भेट

श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयास जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांची भेट

जिल्हाधिकारी उस्मानाबाद तथा अध्यक्ष श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर यांनी श्री तुळजाभवानी सैनिक विद्यालयास भेट देऊन विद्यालयाच्या उन्नतीसाठी शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी व विद्यार्थ्यांची सुसंवाद साधून विद्यालयाचे वाटचाल समजून घेत उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले त्यावेळी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले विद्यालयात आगमन होताच बालसैनिकांनी संचालन करून माननीय जिल्हाधिकारी यांना मानवंदना दिली व काही विद्यार्थ्यांनी विविध अडथळे पार करून शारीरिक कसरतीचे प्रात्यक्षिक करून दाखवले शाळेच्या स्थापनेपासून शाळेच्या वाटचालीस वाटचालीचा प्रवास आपल्या प्रस्ताविकेतून विद्यालयाचे प्राचार्य श्री विवी घोडके यांनी मांडला त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी यांनी विद्यालयातील 50 टक्के पेक्षा अधिक विद्यार्थी एनडीए परीक्षेत पात्र व्हावे तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सैनिकी दलामध्ये अधिकारी पदावर नियुक्त होण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले यासाठी सातारा सैनिकी शाळा व सैनिकी क्षेत्रा तील तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे असे सुचित केले त्यासाठी विद्यालयात दोन डिजिटल क्लासरूम उपलब्ध कराव्यात अशा सूचना देण्यात आल्या त्याचबरोबर सीएसआर फंडातून 40 संगणक प्राप्तीसाठी प्रस्ताव सादर करण्यास सांगितले विद्यालयास पंचवीस वर्षे पूर्ण झालेले रोपे महोत्सवी वर्ष साजरे करणे द्यावे असे सूचित केले विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी संवाद साधून कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या याप्रसंगी तुळजापूरचे माननीय तहसीलदार तथा विश्वस्त माननीय सौदागर तांदळे साहेब मान्य तहसीलदार तथाव्यवस्थापक प्रशासन माननीय श्रीमती योगिता कोल्हे व श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे माननीय लेखाधिकारी माननीय एस एस शिंदे उपस्थित होते .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पांचाळ डी एस यांनी केले तर स्वामी आरएस यांनी आभार मानले

← All notices